निवडणूकांमध्ये कधी हार तर कधी जित मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कप आम्हीच जिंकणार – रामदास आठवले

नाशिक(वास्तव संघर्ष) – खेळात कधी हार तर कधी जित होते. तसेच राजकारणात आहे. निवडणूकांमध्ये कधी हार तर कधी जित होत राहते. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कप आम्ही ( महायुती ) च जिंकणार आहोत असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. नाशिक च्या महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित दिवंगत ई एन निकम स्मृतिदिना आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.यावेळी महिला क्रिकेट चा विश्वकप जिंकणाऱ्या राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम यांचा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महिलांनी क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रात पुढे आले पाहिजे असे आवाहन करून क्रीडा क्षेत्रात मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार ना रामदास आठवले यांनी केला.

यावेळी कस्टम अधिकारी आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक रिपाइं चे ज्येष्ठ नेते दिवंगत एकनाथ नानाजी उर्फ ई एन निकम यांच्या आणि त्यांचे लहान भाऊ दिवंगत पँथर नेते दादाभाऊ निकम यांच्या स्मृतींना ना रामदास आठवले यांनी उजाळा देत आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत ई एन निकम यांना आदरांजली वाहणाऱ्या संगीतसीडीचे प्रकाशन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत निकम यांनी केले होते. यावेळी विचार मंचावर रिपाइं चे प्रकाश लोंढे;काकासाहेब खंबाळकर; आमदार देवयानी फरांदे; प्रियकीर्ती त्रिभुवन; डी एम चव्हाण; साहस कांदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नव्वदीतील आजीबाई कमलबाई भोळे यांचा आणि संगीतकार पंडित धुमाळ यांचा ही ना रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Share this: