सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरीत वंचित बहुजन आघाडीची उद्या भव्य बाईक रॅली!

पिंपरी : (वास्तव संघर्ष ) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरीत उद्या बुधवारी (दि. 8 ) साडे दहा वाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या प्राधिकरण येथील पोस्ट ऑफिस कार्यालयापासून रॅलीची सुरुवात होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला आयु. सुजात प्रकाश आंबेडकर हे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून शहरात वंचितचा जोरदार झंझावात सुरू आहे. घरोघरी सिलेंडर हे चिन्ह पोचविण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. वंचितचे आव्हान उभे राहिल्याने प्रस्थापित पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी मतदार संघातून वंचीत बहुजन आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले आहे. सध्या सत्ताधाऱ्याबाबत असणारी नाराजी वंचितच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांनीही प्रचारात सध्या तरी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन केले आहे.

रॅलीची सुरुवात प्रवीण गायकवाड यांच्या प्राधिकरण पोस्ट ऑफिस येथील कार्यालयापासून होणार आहे. ही रॅली पिंपरी मतदारसंघातुन निघणार आहे. रॅलीत सुजात आंबेडकर प्रमुख आकर्षण आहे. सुजात आंबेडकर यांनी सम्यक संवाद हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करत तरुणांना जोडले आहे. उद्या ते पिंपरीत बाईक रॅलीला येणार असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रॅलीची सांगता होणार आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी साडे दहा वाजता प्रवीण गायकवाड यांच्या प्राधिकरण येथील कार्यालयाजवळ उपस्थित रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this: