शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना अजित पवार यांचा जाहीर पाठिंबा

चिंचवड (वास्तव संघर्ष) :- गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर व चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

राहुल कलाटे हे शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते आहेत. ते महायुतीकडून चिंचवड विधानसभेतून इच्छुक होते. मात्र मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज सादर केला होता. चिंचवडमधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे महायुतीकडून रिंगणात आहेत. त्यामुळे राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्यामुळे चिंचवडच्या या जागेवर अटी-तटीची लढत होणार व त्यामुळे या मतदारसंघात वेगळीच चुरस पहावयास मिळणार आहे.

दरम्यान या आधीच भोसरी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने घोषित केले आहे. तेथे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.

या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, योगेश बहल, विलास लांडे, राहुल कलाटे, आण्णा बनसोडे, मंगला कदम, शेखर ओव्हाळ व आदी उपस्थित होते

Share this: