अजित पवार स्वताच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत ते पुरस्कृत उमेदवार कसे निवडुन आणणार – खासदार – श्रीरंग बारणे

पिंपरी(वास्तव संघर्ष) अजित पवार हे स्वताच्या मुलाला लोकसभेला निवडून आणू शकले नाहीत. तर, विधानसभेला त्यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवारांची स्थिती काय होईल अशी बोचरी टीका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पञकार परिषदेत केली.

यावेळी खासदार बारणे म्हणाले, शहरात दोन ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवारही मिळू शकला नाही, एवढी त्यांची अवस्था वाईट आहे,असा टोला त्यांनी लगावला.चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले पालिकेतील शिवसेना पक्षाचे गटनेते राहूल कलाटे यांच्यावर कारवाईचा निर्णय दोन दिवसांत होईल,असेही बारणे यांनी सांगितले.

यावेळी खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, चिंचवडचे उमेदवार लक्ष्मण जगताप,भोसरीचे उमेदवार महेश लांडगे पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. . 

Share this: