शिवसेनेचे गौतम चाबुकस्वारांना मतदार राजाने नाकारले ;आण्णा बनसोडे आणि बाळासाहेब गायकवाड यांचे नाव सर्वेत आघाडीवर

पिंपरीतील गांधीनगर आणि खराळवाडीत एकुण पंधरा हजार मतदान ;चाबुकस्वार यांचा फक्त २३३५ फरकाने गेल्या वेळी निसटता विजय

दिपक साबळे..! पिंपरी (वास्तव संघर्ष) विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात अनेक उमेदवार आपला प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारासाठी अनेक युक्त्या पण वापरत आहेत मोठ मोठ्या सभा घेतल्या जातात माञ जो खरा मतदार आहे त्या मतदारांना कुणी विचारात घेताना दिसत नाही त्यामुळे पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीत आणि खराळवाडीत राहणाऱ्या सामान्य माणसाचा सर्वे वास्तव संघर्ष ने केला आहे.

या सर्वेक्षणातून नागरिकांचा कल नेमका पिंपरी विधानसभेच्या कोणत्या उमेदवाराकडे आहे याचा वेध घेण्यात आला, असून शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना येथील नागरिकांनी सपशेल नाकारले असून शिवसेनेची संध्याची सिट धोक्यात येणार आहे. गांधीनगर खराळवाडी येथील लोकसंख्या दहा ते पंधरा हजारांच्या आसपास असून त्यांचे मतदान जिंकण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. माञ हे मतदान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आण्णा बनसोडे यांच्याकडे आणि वंचित चे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्याकडे जाणार आहे यामध्ये टक्केवारी काढली तर साठ टक्के मतदार बनसोडे यांच्याकडे असून तीस टक्के मतदार वंचीतचे गायकवाड यांना आहेत तर दहा टक्के मतदान चाबुकस्वार यांना पडतील. त्यामुळे गेल्या वेळी चाबुकस्वार यांचा फक्त २३३५ फरकाने निसटता विजय झाला होता. यावेळी मात्र गांधीनगर आणि खराळवाडीच्या मतदारांची नाराजी चाबुकस्वार यांना धोकादायक ठरणार आहे.

दरम्यान, गांधीनगर खराळवाडी हा पिंपरी विधानसभेत जरी येत असला तरी या मतदारसंघात आमदार गौतम चाबुकस्वार गेल्या पाच वर्षांत फिरकले देखील नाहीत कोण चाबुकस्वार असा प्रश्न देखील एका महिलेने उपस्थित केला आहे.

Share this: