नितीन आगे प्रकरणातील मुख्यआरोपी रोहित गोलेकरसह इतरांनी दगडाने ठेचून आदिवासी मुलाचा केला खून

दिपक साबळे :वास्तव संघर्ष आॅनलाईन :- अहमदनगर येथील खर्डा जिल्हय़ात एका आदिवासी मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय-२५, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी याप्रकरणी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या बाळूचा मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे.(वास्तव संघर्ष)

२०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे यांच्या खुनातील प्रकरणात मुख्य आरोपी रोहित गोलेकर यांचे नाव असून त्याने आणि इतर चार साथीदार सोबत घेऊन असाच आगे यांचा खून केला होता. नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. संपूर्ण राज्याला नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता.  उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फिरवल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते.(वास्तव संघर्ष)

Share this: