बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सोशल मीडियावर तज्ञांची नेमणूक महापालिकेने करू नये – नाना काटे

 पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर व्हावा यासाठी सल्लागार पदाची नियुक्ती करण्याची मागणीचे  पञ आयुक्तांना दिले आहे.काटे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की पालिकेतील विरोधीपक्षनेता असल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या सामान्य जनतेचा कररुपी पैसा हा त्यांच्या कल्याणासाठीच खर्च व्हावा हि माझी माफक अपेक्षा आहे. परंतु २०१७ नंतर महानारपालिकेमध्ये बाह्य सल्लागाराची प्रचंड प्रमाणात नेमणूक झाली आहे. आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये नियुक्त झालेल्या सर्व आयुक्तांनी महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून/कर्मचाऱ्यांकडून यशस्वीरीत्या कामे करवून घेतली आहेत तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या काळात केंद्र सरकार, राज्य सरकारकडून शहरास विविध पुरस्काराने गौरविले आहे. परंतु आपल्या  कार्यकाळात ज्या प्रमाणात बाह्य सल्लागारांची नेमणूक होत आहे त्यावरून असे दिसते कि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने नियुक्त केलेले अधिकारी  काम करण्यास पूर्णपणे सक्षम नाहीत किंवा बाह्य सल्लागार नेमण्या मागे अजून काही हेतू असावा का ?

मा. स्थायी समितीच्या दिनांक १३/११/२०१९ कार्यपत्रिकेवर  महानगरपालिकेने  “शहर परिवर्तन कार्यालय अंतर्गत नागरिकांशी संलग्नता व त्या बाबत सोशल मीडियाचा प्रभावी वापर बाब” ( Social Media Expert) या पदासाठी सहा महिने कालावधीकरता दरमहा ७०,०००/- रुपये एकत्रित मानधन नेमणूक करणेकामी एकत्रित  र.रु. ४,४२,०००/-  च्या खर्चास मान्यता देण्याचा विषय ठेवण्यात आलेला आहे. सदरचा विषय हा एखाद्या विशिष्ठ व्यक्तीस डोळयासमोर ठेवून ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये नागरीकांच्या कररुपी पैशांची नासाडी होणार आहे, तसेच आपल्याकडे स्मार्ट सिटी” प्रकल्पाअंतर्गत Tech Mahindra या कंपनीस  करोडो रुपयांचे  काम दिलेले आहे. त्यामध्ये “सोशल मीडिया मॅनेजमेंन्ट” हा एक भाग आहे. ती कंपनी हे काम करू शकत नाही का?

मा. आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याकाळात “सारथी” हि मदत प्रणाली तयार करताना अनेक संगणक अभियंत्यांची मदत झाली होती. आणि त्यासाठी त्यांनी कोणताही मोबदला घेतल्याचे मला आठवत नाही.

           जनतेच्या पैश्याचा अश्या तर्हेने अपव्यय व्हावा ह्यासारखी दुर्दैवी बाब नाही. जनतेचा कररुपी पैसा त्यांना सुविधा देण्यासाठी वापरण्यात यावासत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांचीकार्यकर्त्यांची पोटे भरण्यासाठी नाही. तुम्ही स्वतः सज्ञान आहात आणि मला आशा आहे कि अश्या तऱ्हेने कार्यकर्त्याचीत्यांच्या नातेवाईकांची बाह्य सल्लागार म्हणून होत असलेली नेमणुकीला तुम्ही आळा घालाल असे ही नाना काटे म्हणाले

Share this: