बातम्यामहाराष्ट्र

तुमची सेवा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला;तुमची वहिनी बनून ५ वर्षं खूपच संस्मरणीय-अमृता फडणवीस

वास्तव संघर्ष आॅनलाईन : महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा जवळ जवळ संपुष्टात आला आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर क्षणांचं फडणवीस सरकार मावळले आणि आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे वेध सगळ्यांना लागले आहेत.आजच्या सगळ्या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं त्यामुळे मी भारावून गेले. मी माझ्या परीने तुमची सेवा करण्याचा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी लिहिलं आहे.

तुमची वहिनी बनून ही 5 वर्षं खूपच संस्मरणीय होती, असंही अमृती फडणवीस यांनी लिहिलं आहे

https://twitter.com/fadnavis_amruta/status/1199345002414927872?s=19
Share this: