पिंपरीतील गांधीनगर येथे प्रियसीवर ब्लेडने वार करणा-या प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड मधील गांधीनगर येथे किरकोळ कारणावरून वाद घालत प्रियसीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून तीच्यावर ब्लेडने वार केले आहे. बुधवारी (११ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे.

आलम उर्फ सब्री आलम फरेदी (वय-२८, रा गांधीनगर झोपडपट्टी पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत मागील दिड वर्षापासून त्याचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. बुधवारी दुपारी त्याच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपीने तरुणीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून तीच्यावर ब्लेडने हातावर छातीवर आणि गालावर वार करुन जखमी केले. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: