पिंपरी चिंचवडमध्ये भीक मागणाऱ्या महिलेकडे आढळली तब्बल अकरा लहान मुले

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे सिग्नलवर भीक मागणाऱ्या महिलेकडे तब्बल अकरा लहान मुले मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार बुधवारी (दि. १८) काळेवाडी येथे उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील तापकीर चौक सिग्नलजवळ रात्री वेगवेगळ्या वयोगटांतील अकरा मुले भीक मागत होती. नगरसेवक अभिषेक बारणे यांना याबाबत संशय आला. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता एका भीक मागणाऱ्या महिलेची ही सर्व मुले तिची व तिच्या मोठ्या बहिणीची असून पती सांभाळ करीत नसल्याचे त्यांना सांगितले.

मात्र, बारणे यांनी हा मानवी तस्करीचा प्रकार वाटल्याने मुलांना घेऊन थेट वाकड पोलिस ठाणे गाठले. वाकड पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, मुलेदेखील पोलिसांच्या प्रश्नावर एकसारखी उत्तरे देत असल्याने त्यांना प्रशिक्षण दिले गेलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Share this: