लेख-कविता

बाप माझा(कविता)

File Photo

आभाळापेक्षा उंच दिसे बाप माझा
सावळाच पण नेटका असे बाप माझा.

झिंगणा-या वस्तीत सदा राबतो तरी
प्याल्यापासून दूर असे बाप माझा.

जन्मभर फाटका तुटका राहून सुद्धा
माझ्या सद-याचा खिसा असे बाप माझा.

कुणी कितीही मला डसले आणिक पिसले
रित्या काळजातला ओलावा असे बाप माझा.

साध्या उत्तीर्ण जरी झालो मी शाळेच्या यत्ता
गावभर सांगत असे बाप माझा.

मोठा साहेब होऊनी त्याला सांभाळेल मी
हीच आशा धरूनी हसे बाप माझा.

कवी-गणेश शाहू सोनपारखे
हडपसर पुणे
Mobile-7776883286

Share this: