मी सांगवीचा भाई आहे..! नव-याला सोडून तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणत विवाहीतेला धमकी

वास्तव संघर्ष..!

पिंपरी :पिंपरी चिंचवड येथील पिंपळेगुरव येथे एका विवाहीत महीलेला तथाकथित ‘भाई’ ने धमकी दिली आहे. तुझ्या नव-याला सोडून माझ्यासोबत रहा.. आपण दोघे लग्न करू.. असे बोलून विविहीत महिलेला मारहाण केली. ‘मी ईथला भाई आहे’असे म्हणत हातात चाकू घेऊन तिच्या पतीच्या अंगावर धावून जात धमकी दिली. पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. 18) हा प्रकार घडला. आरोपी दोन वर्षांपासून पीडितेचा पाठलाग करीत असून, याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इसाक उर्फ गुड्ड्या रज्जाक शेख (रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख याने वेळावेळी फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. पतीला सोडून तू माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू, असे म्हणाला. त्यास महिलेने नकार दिला. त्यानंतर फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबलेल्या असताना आरोपी तेथे आला. त्यावेळी हातामध्ये चाकू घेऊन महिलेच्या पतीच्या अंगावर धावून गेला. ‘’मी सांगवीचा भाई आहे’ असे बोलून शिवीगाळ केली..

त्यानंतर महिलेला लाथ मारली. तसेच चापट मारून त्यांच्या कानाला जखम केली. त्यानंतर एका फ्लॅटच्या दरवाजावर लाथा मारून कडी तोडून नुकसान केले. फिर्यादीच्या पतीस फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत

Share this: