पञकार संतलाल यादव हल्ला प्रकरण ;आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहरात सिद्धांत समाचार या दैनिक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच रफ्तार बुलेटिनचे मुख्यसंपादक संतलाल यादव यांच्यावर काळेवाडी येथे गुडांनी प्राणघातक हल्ला केला होता. तसेच, जिवे मारण्याची धमकी देत घरावर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील चार जणांना अटक केली आहे आहे

याप्रकरणी पत्रकार संतलाल रोशनलाल यादव (रा. सहकार कॉलनी, जोतिबानगर, काळेवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण नढे, नवनाथ नढे, संतोष काळे, खंडू कांबळे,सनी यादव (सर्व रा. काळेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. महेश नढे याच्यासह अन्य सात आरोपी फरारी आहेत.

दरम्यान अटक केलेल्या आरोपींची दोन दिवस पोलीस कोठडी आणि रिमांड घेण्यात आले. त्यानंतर आज रोजी आरोपींना येरवडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले.

बुधवारी (ता. २५) सकाळी सातच्या सुमारास यादव यांची मुले हर्षद (वय १६) व प्रतीक (वय १८) यांची भारतमाता चौकात झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी त्यांच्या घरात शिरले. यादव यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना घराबाहेर ओढत आणले. त्यांना लाकडी दांडक्‍याने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, यादव यांना चाकू मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून घरात जाऊन दरवाजा बंद केला. या वेळी टोळक्‍याने त्यांच्या घरावर दगडफेक केली. जिवे मारण्याची धमकी देत टोळके पसार झाले. अटक आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत

Share this: