सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रामदास आठवले मैदानात ;आज होणार मुंबईत रॅली

मुंबई (वास्तव संघर्ष) – सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी आज रविवार दि. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बांद्रा पूर्वेतील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ ‘आय सपोर्ट सीएए रॅली ‘चे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत मुंबईतील रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे. या रॅली मध्ये ना रामदास आठवले रिपाइं कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहेत. अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला लोकशाही मार्गाने संसदेत मंजुरी मिळाली असून हा कायदा देशाच्या हितासाठी आहे. देशातील मुस्लिमांच्या विरोधात किंवा अन्य कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात हा कायदा नाही. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात समाज विघातक शक्तींकडून होणाऱ्या अपप्रचाराला बळी पडू नका.नागरिकत्व सुधारणा कायदा देशाच्या हिताचा असून या कायद्याच्या समर्थनासाठी बांद्रा पूर्वेला सी ए ए समर्थन रॅली चे आयोजन करण्यात आले असून या रॅली चे आयोजक नरेंद्र नायर असून या रॅलीत रिपाइं कार्यकर्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

Share this: