अजित पवार पुन्हा एकदा झाले उपमुख्यमंत्री

वास्तव संघर्ष न्यूज :- मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री होणार की, महत्वाचं कॅबिनेट मंत्री पद देणार यावर बरीच चर्चा रंगली होती. पण, शपथविधीच्या काही तास अगोदर त्यावरून पडदा दूर झाला. अजित पवार यांनी दीड महिन्याच्या अवधीतच दुसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होण्याची अजित पवार यांची तिसरी वेळ आहे. यात ते तीन वेगळवेगळ्या पक्षांचं सरकार असताना त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे अजित पवार आणि उपमुख्यमंत्रीपद यांचं खास नातं तयार झालं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार कायमचं राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहेत. अगदी अलिकडेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार पक्षाचे गटनेते असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचं सरकार स्थापन केलं.माञ भाजपा-राष्ट्रवादीचं हे सरकार फार तग धरू शकलं नाही. प्रचंड मोठ्या राजकीय नाट्यानंतर चार दिवसांत हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते…

दरम्यान राष्ट्रवादी कांग्रेस क्रांग्रेस आणि शिवसेना यांनी केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत.

Share this: