नगरसेवकांना चोर म्हटल्याप्रकरणी भाजप पक्षनेत्यांना काळे फासण्याचा दत्ता साने यांचा सभेतच इशारा

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड भाजप सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेवकांना चोर असे उद्देशून केलेल्या विधानांचे पडसाद शुक्रवारी महापालिका सभेत उमटले. पवारांचा निषेध करतानाच त्यांना भर चौकात काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सभेतच दिला.

दरम्यान, भाजप नगरसेवकांच्या बेशिस्त वर्तनाची गंभीर दखल घेताना त्यांना इशारा देण्यासाठी म्हणून पवारांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिले होते. त्यात त्यांनी नगरसेवकांना उद्देशून केलेली शेरेबाजी त्यांच्या अंगलट आली आहे. शुक्रवारी दुपारी सभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी हा विषय उपस्थित केला. पक्षनेते पवार यांनी अकलेचे तारे तोडल्याचे ते म्हणाले. तसेच पवार नगरसेवकांना उद्देशून चोर म्हणाले, याचा त्यांनी निषेध केला. त्यांना भर चौकात काळे फासण्यात येईल, असा इशाराही साने यांनी यावेळी दिला.

Share this: