बातम्यामनोरंजन जगत

‘छपाक’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पाच कोटींची कमाई



वास्तव संघर्ष आॅनलाईन :-  ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.चित्रपट प्रदर्शनापूर्वी दीपिकाने  जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (JNU) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात लावलेल्या हजेरीमुळे सोशलमिडीयावर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती माञ प्रेशकांनी चिञपटला पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद देऊन  ‘छपाक’ चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर पाच कोटींची कमाई केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचं आयुष्याची खरी वास्तविकता चिञपटात दाखवली आहे. अॅसिड हल्यानंतर ‘लक्ष्मी’ ला करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘छपाक’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाच कोटींचा गल्ला जमावला आहे. तसेच आवड्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Share this: