केंद्र सरकार संविधान नुसार काम करीत असून आरोप करणाऱ्या नेत्यांनी गरुड्या सारखे वागू नये-रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बांद्रा येथे सीएए समर्थन रॅली

मुंबई – सी ए ए के सन्मान मे आरपीआय मैदान मे ! शेतकऱ्यांचा सात बारा कोरा; मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा असा ईशारा देणाऱ्या घोषणा देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बांद्रा पूर्वेत संविधान निवसस्थानापासून बांद्रा जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानासमोर माथा टेकणारे पाहिले पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार संविधानानुसार काम करीत आहेत. संविधान रक्षणाचे काम करीत आहे. मात्र काही नेते केंद्र सरकारला बेवड्याची उपमा देऊन टीका करीत आहेत मात्र त्यांना माझे सांगणे आहे की केंद्र सरकार संविधान नुसार काम करीत असून आरोप करणाऱ्या नेत्यांनी गरुड्या सारखे वागू नये असा टोला ना. रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला.
पश्चिम बंगाल मधील दलित असलेल्या नामशुद्र लोकांनी त्यांच्या वर बांग्लादेशात अन्याय होत असल्याने त्यांना भारतिय नागरिकत्व द्यावे अशी मागणी केली होती.तसेच नुकतेच पाकिस्तानात गुरूनानकांचे जन्मस्थळ असलेल्या नानाकाना साहिब या पवित्र गुरुद्वारावर दगडफेक झाली होती. या हल्ल्याच आम्ही तीव्र निषेध केला आहे. मात्र पाकिस्तान ; अफगाणिस्तान ;बांगलादेश येथील मुस्लिम बहुल देशांत अल्पसंख्याक असलेल्या हिंदू ; हिंदू दलित; शीख; बौद्ध;ख्रिश्चन या धर्मीयांवर अत्याचार होतात. त्यामुळे तेथून जीव वाचवून भारतात आलेल्या शणार्थींना नागरिकत्व माणुसकीच्या नात्याने दिले पाहिजे. त्यासाठी नागरीकत्व सुधारणा कायदा असून त्यात पाकिस्तान अफगाणिस्थान आणि बांगलादेशातील मुस्लिमांना वगळले आहे. जर वगळले नसते तर सरसकट या तिन्ही देशातील मुस्लिमांना नागरीकत्व द्यावे लागून देशाची सुरक्षा धोक्यात आली असती. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.


जे एन यु मध्ये मी दलित पँथर च्या काळात जात होतो तेंव्हा तिथे शांतता होती. मी जे एन यु मध्ये जाणे सोडले तेंव्हापासून तिथे गुंडागर्दी सुरू झाली. महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी राहावे.महाविद्यालयात आचारसंहिता असावी. उजवे; डावे; कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी अशी विचारधारा असावी मात्र विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव आणि राजकारण लावू गुंडागर्दी करू नका. महाविद्यालयात कोड ऑफ कंडक्ट असावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी यावेळी केली. जे एन यु मध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे मात्र त्याच्या निषेधात गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईत झालेल्या आंदोलनात फ्री काश्मीर चा फलक झळकविणे योग्य नव्हते. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने काश्मीर मध्ये 370 कलम हटविले; तीन तलाक चा कायदा मंजूर केला. अयोध्येतील राम मंदिर चा मोठा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सुटला . त्यावर कुठेच सरकार विरोधात आंदोलन करण्याची संधी विरोधकांना मिळाली नाही .मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधक भारतीय मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरवीत आहेत. सीएए कायद्याचा भारतीय मुस्लिमांना कोणताही धोका नाही.. दलित बहुजन अल्पसंख्यंकांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास जिंकणारे मोदींच्या नेतृत्वातील सरकार असल्याचा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

यावेळी रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ.सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; अनिलभाई गांगुर्डे; किसन रोकडे; अमित तांबे; हरिहर यादव; प्रकाश जाधव ; बाळासाहेब गरुड; सौ शिलाताई गांगुर्डे; सौ शकुंतला आठवले; एड.आशाताई लांडगे;एड. अभयाताई सोनवणे; उषाताई रामळू; सौ.नैनाताई संजय वैराट ; बेला मेहता; रमेश गायकवाड; रतन अस्वारे; चंद्रशेखर कांबळे; संविधान जनजागरण समिती चे अध्यक्ष कैलास सुरवाडे ; रवी गायकवाड; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच मागासवर्गीय महामंडळाची कर्ज माफ करावीत; शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा; एस आर ए मध्ये झोपड्यांचे पुनर्वसन करताना 550 फुटांची सदनिका झोपडीधारकांना देण्यात यावी. रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेची जमीन राज्य शासनाने खरेदी करून तेथे एस आर ए योजना लागू करावी; विमानतळ परिसरातील झोपड्यांचे तीन किमी च्या परिसरात पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी आज केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बांद्रा येथे रॅली मध्ये करण्यात आली.

नागरीकत्व सुधारणा कायदा मागासवर्गीयांचे कर्ज माफ करा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Share this: