महापौर चषक ‘टेन-20’शालेय क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन इंद्रायणीनगर मैदानावर रंगला सोहळा 

पिंपरी (वास्तव संघर्ष) –  पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रीडा समितीच्या वतीने वतीने आयोजित महापौर चषक शहर ‘टेन-20’ शालेय क्रीडा स्पर्धाचा शानदार उद्घाटन सोहळा  रविवारी (दि.12) इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानवार रंगला. खेळाडू पथकाची मानवंदना, क्रीडा ज्योत, प्रतिज्ञा, समुहगीत, शुंभकराचे अनावरण, शहरातील दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आदी  भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला हा सोहळा क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी ठरला.


क्रीडा संकुलातील सिथेंटीक ट्रॅकवर स्पर्धेचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी क्रीडा समिती सभापती तथा उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन, राजु मिसाळ, सागर गवळी, विकास डोळस, नगरसेवक आशा शेंडगे, मोरेश्वर शेडगे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहायक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, पॅरॉलिम्पिक खेळाडू मुरलीकांत पेटकर, ऑलिम्पिक कुस्तीपटू मारूती आडकर तसेच, शिव छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


 विविध शाळेतील विद्यार्थी- खेळाडूंच्या पथकाने संचलन करून महापौरांना मानवंदना दिली. तसेच, पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी समुहगीत सादर केले. महापौरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवण्यात आली. ही क्रीडा ज्योत महापालिका भवन ते इंद्रायणीनगर स्पर्धा मैदानापर्यंत आणण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धेची प्रतिज्ञा देण्यात आली. पॅरॉलिम्पिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर आणि ज्येष्ठ खेळाडूंचा गौरव करण्यात आला..


मागर्दशन करताना महापौर ढोरे म्हणाल्या की,शालेय विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती जागृत झाली पाहिजे, या करिता महापौर चषक  स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वर्षभर शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेत ही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


उपमहापौर तुषार हिंगे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेत 19 हजारांहून अधिक  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून, पालिकेच्या विविध मैदानांवर या स्पर्धा होणार असल्याचे नमूद केले. सहायक आयुक्‍त संदीप खोत यांनी स्पर्धेची माहिती दिली. स्पर्धेत विविध 20 क्रीडा प्रकार आणि 6 सांस्कृतिक स्पर्धा पुढील 20 दिवसात होणार आहेत. त्यात सुमारे 19 हजार विद्यार्थी आपले नशीब आजमवणार आहेत. स्पर्धेेतील अंतिम लढती आणि बक्षीस वितरण सोहळा म्हाळुंगे-बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे 2 फेबु्रवारीला होणार आहे. प्रफुल्ल पुराणिक यांनी सुत्रसंचालन केले. रज्जाक पानसरे यांनी आभार मानले

Share this: