पिंपरीमधील संजय गांधीनगर परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत दहशत

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीमधील संजय गांधीनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने दहशत पसरवत सात ते आठ वाहनांची तोडफोड केली . ही घटना सोमवारी ( दि . 13 ) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली .

पिंपरीतील संजय गांधी नगर परिसरात सोमवारी रात्री दुचाकीवरून टोळके आले . आरडाओरडा तसेच दहशत पसरवत त्यांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड केली . घटनेनंतर टोळके पसार झाले . घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले . या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .

Share this: