बाल्कनीतून पडल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू;पिंपळे गुरव येथील घटना

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपळे गुरव परिसरात राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . ही घटना सोमवारी ( दि . 13 ) पहाटेच्या सुमारास घडली . गौरी राऊत ( ११ , रा . पिंपळे गुरव ) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पहाटेच्या वेळी एक व्यक्ती रस्त्याने गौरी राहत असलेल्या इमारतीच्या खालून रस्त्याने जात होता . तेव्हा त्याला गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली . त्यानंतर तो व्यक्ती इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने गौरीच्या घराचा दरवाजा ठोठावला . घरातील व्यक्तींना झोपेतून उठवून त्या वाटसरूने घटनेची माहिती दिली . त्यानंतर तातडीने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले . मात्र , रुग्णालयात उपचार करण्यापूर्वी गौरीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता .

Share this: