धक्कादायक : पुणे येथील पाषाण तलावाच्या परिसरात आढळून आले दोन नवजात बाळ

पुणे – येथील पाषाण तलावाच्या परिसरातील दोन जुळी नवजात जिवंत बाळ आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, यावेळी घटनास्थळी असलेल्या महिलांना या चिमुकल्यांचे रडणे सहन झाले नाही त्यांनी जवळच्या दुकानातून दुध आणून या बाळांना दुध पाजण्याचा प्रयत्न केला.

यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. येथील काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे .

अशा पध्दतीने तलावाच्या परिसरातील या नवजात बालकांना कुणी टाकले? ही जुळी मुले कोणाची आहेत , त्यांना तेथे कोण सोडून गेलं याबाबत पोलिसांचा तपास करीत असून परिसरातील नागरिकांकडून अधिक माहिती घेत आहेत .

Share this: