चिखलीत बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

File Photo

चिखली – पिंपरी चिंचवडमधील चिखलीतील कुदळवाडी परिसरात बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे .सचिन बबुशा शेटे ( वय २४ , रा . शेटेवाडी , वाडा , ता . खेड ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे .

पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी शेटे हा रविवारी ( दि .१२ ) रात्री साडेदहाच्या सुमारास कुदळवाडी , चिखली येथे आला होता . त्यावेळी संशयावरून चौकशी केली असता त्याच्याकडे २५ हजार ५०० रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले . पिस्तूल काडतूस जप्त करून त्याला अटक करण्यात आली अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: