पत्नीचा खून करून पतीने केली गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . हा प्रकार आज , मंगळवारी ( दि .१४ ) भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे .

प्रियंका देशमुख ( रा . शास्त्री चौक , भोसरी ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी पती निलेश आणि मयत पत्नी प्रियंका यांना सात वर्षाची मुलगी आहे . भोसरी मधील शास्त्री चौकात हे कुटुंब राहत होते . निलेश याने पत्नी प्रियंकाचा गळा दाबून खून केला . त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे .

Share this: