अज्ञात चोरट्यांकडून फ्लॅटचा लॉक तोडून चार लाख तीस हजार किंमतीचा एवज लंपास

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड येथे अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा लॉक तोडून घरफोडी करून घरातून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आहे . हा प्रकार सोमवारी ( दि . 13 ) पहाटे अडीचच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला .

या प्रकरणी परशुराम एकनाथ जगदाळे ( वय ५७ . रा . एस के एफ हाउसिंग सोसायटी , चिंचवड ) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार तीन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी जगदाळे यांचे घर लॉक लावून बंद होते . तीन अनोळखी चोरट्यांनी दरवाजाचे लोक तोडून सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घरात प्रवेश केला . बेडरूममधील लाकडी कपाटातील चार लाख तीस हजार रुपये किमतीचे १३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली .

Share this: