काळेवाडी फाटा येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालकावर तलवारीने वार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : – पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी फाटा रिक्षा स्टँडवर रिक्षा चालकांमध्ये झालेल्या प्रवासी भरण्याच्या वादातून तिघांनी एका रिक्षाचालकावर तलवारीने वार करुन जखमी केले . ही घटना शुक्रवारी (दि. १०) रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली . सूरज चंदनशिवे हा जखमी झाला आहे . तर स्वप्नील नागनाथ चंदनशिवे ( 21 , रा . रहाटणी ) याने फिर्याद दिली आहे . तर पंकज पाचपिंडे , सोन्या पाचपिंडे ( दोघे रा . रहाटणी ) आणि त्यांच्या एकाच साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी आणि सूरज हे रिक्षाचालक आहेत . शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील रिक्षा स्टॅडवर प्रवासी भरण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला . या वादाच्या कारणावरून आरोपींनी संगणमत करून सूरज चंदनशिवे याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . त्यानंतर आरोपी सोन्या आणि पंकज यांनी रिक्षातील तलवार काढून सूरजच्या डोक्यावर वार केले . यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला . तपास वाकड पोलीस करत आहेत .

Share this: