क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रेमविवाह केला म्हणून घरच्यांनी घराबाहेर काढले;घरातून बाहेर काढल्याने पत्नीला मारहाण

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथे गणेश भाजी मंडईजवळ नुकतीच एक घटना समोर आली आहे प्रेमसंबधांतून लग्न केल्याने नवदाम्पत्यास कुटूंबीयांनी घराबाहेर काढले . त्याचा राग मनात धरून पतीने पत्नीलाच मारहाण केली . यात पत्नी जखमी झाली आहे.

या प्रकरणी २५ वर्षीय नवविवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते . यातून त्यांनी ३ जानेवारी रोजी नोंदणीकृत पद्धतीने लग्न केले . पतीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता . त्यामुळे त्यांनी नवदाम्पत्याला घराबाहेर काढले . पतीच्या मनात याचा राग होता . त्यातून आरोपी पतीने आपल्या पत्नीलाच काठीने मारहाण करून जखमी केले . भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत .

Share this: