काळेवाडी येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड

पिंपरी(वास्तव संघर्ष) : – पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . हा प्रकार सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडला . या प्रकरणी पीडित २२ वर्षीय पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . तर २७ वर्षीय पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती घरी गेल्यावर पीडित पत्नी घरी झोपल्या होत्या . त्यावेळी पतीने त्यांना झोपेतून उठवले . ‘तेरा किसके साथ संबंध हे , मुझे सब मालूम हे , तू सच बता ‘ असे म्हणून तुला आज खल्लास करतो अशी धमकी देत डोक्यात दगड मारत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Share this: