बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन त्याच जागी होईल ;आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद – गीता मंचरकर

पिंपरी: (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी सर्व्हे सुरू केला आहे . या सर्व्हेक्षणासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेविका गीता मंचरकर यांनी दिली .

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन आजवर झालेच नाही . या ठिकाणी शेकडो नागरिक राहतात . पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिल्यानुसार सर्वेक्षणाला सुरवात केली असून , प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येत आहे .

शहर सुधारणा समितीमध्ये ठरावही केला आहे . झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी , त्यांचे स्वमालकीचे घर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत . दरम्यान, गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे त्याच जागेवर करण्यात यावा यासाठी आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे देखील नगरसेविका गिता मंचरकर यांनी सांगितले .

Share this: