पालकमंत्री अजित पवार यांचे निमंत्रण पञिकेतील नाव गायब ;नाना काटे यांनी पालिकेला खडसावले

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन / उद्घाटने वेळोवेळी होत असतात. त्यावेळी राज शिष्टाचारानुसार शहरातील जिल्हाचे पालक मंत्री मा.आमदार,खासदार मनपाचे पदाधिकारी तसेच ज्या प्रभागात कार्यक्रम असेल त्या मा.स्थानिक नगरसदस्यांची नावे टाकने बंधनकारक आहे.माञ पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे त्यामुळे शहरातील पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने त्यांचा नामोल्लेख मुद्दामून भाजपने निमंत्रण पञिकेत टाळला का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत

 
दरम्यान यावर पालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पञ काढून पालिकेला खडसावले आहे ते म्हणाले, राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आहे. महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर अद्याप राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालक मंत्री मा. अजितदादा पवार यांचे नांव टाकण्यात येत नाही, हि खेदाची बाब आहे राज्यात जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा मा. गिरीश बापट पुणे जिल्हाचे पालकमंत्री झाले तेव्हा मनपामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची सत्ता होती. तेव्हा मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत मा. गिरीश बापट यांच्या नावांच्या तत्काळ समावेश केला होता. परंतु भाजपाचे पदाधिकारी  हा मोठेपणा दाखवत नाहीत, त्यामुळे आम्हांला पालक मंत्र्याचे नांव मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत समावेश करणेबाबत पत्र द्यावे लागत आहे हि खेदजनक बाब आहे.

       येथून पुढील मनपाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये  राज शिष्टाचारानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांचे नांव टाकण्यात यावे. तसेच मनपाचे विविध प्रकल्पांच्या भूमिपूजने, उद्घाचने व विविध कार्यक्रमाची निमंत्रणे पालक मंत्र्यांना पाठवावीत व राजशिष्टाचाराचे पालन करावे असेही नाना यांनी पञाद्वारे सांगितले

Share this: