शिक्षणशास्त्र संकुलाच्या आंतरवासीता उपक्रमाला कुसूमताई अध्यापक विद्यालयात सुरुवात

नांदेड(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील शिक्षणशास्त्र संकुलातील एम . एड . प्रथम वर्षाचा छात्रशिक्षक सेवाकाल शिबिर कुसुमताई अध्यापक महाविद्यालयात आज दि . 04 / 02 / 2020 पासून प्रा . डॉ . अशोक गिनगिने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले .

या शिबिराचे उदघाटन संकुलाचे संचालक डॉ . चंद्रकात बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . राऊत मॅडम , प्रा . डॉ . गिनगिने सर , कदम सर , अल्ताफ सर उपस्थित होते .

या शिबिरामध्ये अजय पाटील , सचिन काळे , पुंडलिक गच्चे , संतोषी पेशवे , पुजा कंरजे , अनुताई यन्नम , शांतीप्रिया कांबळे , स्वाती राजे यांनी सहभाग नोंदविला आहे .

Share this: