क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर अत्याचार ;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) – अपहरण केलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . काळेवाडी येथे २०१९ मध्ये दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडला होता . याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनिल वाघचौरे ( वय २२ , रा . लांडेवस्ती , भोसरी ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली होती . त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी तपास करीत असताना पीडित मुलीने याबाबत माहिती दिली . आरोपी अनिल वाघचौरे याने गेल्या वर्षी २०१९ मध्ये दिवाळीच्या दिवशी पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या काळेवाडी येथील घरी बोलावले . तेथे आरोपी याने जबरदस्तीने पीडित मुलीवर अत्याचार केला . पोलीस तपासादरम्यान ही बाब समोर आली असून , त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Share this: