क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

यशवंत बाबर यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी ;भोसरी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

पहिल्या चित्रात माध्यमांना माहीती देताना यशवंत बाबर दुस-या चिञात शाळेचे झालेले नुकसानाचे फोटो

भोसरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड येथील  उद्योजक यशवंत बाबर यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांचा गाडी चालक यांना देखील शिवीगाळ करण्यात आली.  तसेच बाबर यांच्या स्वामी समर्थ विद्यालय भोसरी या शाळेतील विरोधकांनी 10 वीची आणि इंग्रजी माध्यमाची विद्यार्थ्यांची शाळेतील लॅबचे तोडफोड देखील केली आहे. हा सर्व प्रकार भोसरी येथे दिनांक (12)रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे

याबाबत राजू बाबर (रा. लांडेवाडी विकास कॉलनी मागे भोसरी) बि. टी साळुंखे, एस आर शिंदे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 504 506,427 नुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

  यशवंत बाबुराव बाबर ( वय 64 , रा . तळेगाव, श्री स्वामी समर्थ फार्म हाऊस , तळेगाव ) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार , क्लार्क – राजू बाबर (वय 35 राहणार. लांडेवाडी विकास कॉलनी मागे भोसरी)मुख्याध्यापक- बि. टी साळुंखे(वय 52,राहणार. इंद्रायणी भोसरी) उपमुख्याध्यापक एस, आर शिंदे ( वय-54 राहणार. जय साम्राज्य सोसायटी भोसरी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यशवंत बाबर यांनी सांगितलेल्या माहीतीनुसार तक्रारीनुसार , आरोपी हे बाबर यांच्या ओळखीचे  असून त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांना वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच फिर्यादी यांचा चालक पार्किगचे फोटो काढत असताना फोटो काढायचे नाही. सदरील शिक्षक हे स्वामी समर्थ विद्यालय भोसरी या शाळेतील मराठी मिडीयमचे शिक्षक असून मराठी मिडीयमच्या लॅब मध्ये येऊन तोडफोड केली. तसेच माध्यमा च्या लँबला कुलुप लावून’ आम्ही उद्या या लॅबमध्ये चार प्लॅस्टिकच्या बाॅटल ठेवून प्रॅक्टीकल सुरु करू अशी धमकी दिली .

मराठी माध्यमाचे उद्या 13 फ्रेब्रुवारी रोजी प्रॅक्टीकल आहे विशेष म्हणजे ही लॅब मराठी माध्यमांच्या संस्थेची आहेे या प्रकाराचे पोलीस जाधव साक्षीदार आहेत.

दहावीचे प्रॅक्टीकल होउ नये, विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे आणि संस्थेचे अध्यक्ष यशवंत बाबर हे गुन्ह्यात अडकून त्यांची प्रतिमा खराब व्हावी या हेतूने हा प्रकार करण्यात आला होता. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Share this: