बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अखेर ‘भिमसंग्राम’ संघटनेच्या आंदोलनाला यश ;बस थांब्याला आणि रस्त्याला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याला लेखी आश्वासन

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामध्ये भिम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत आंदोलन करण्यात येत होते . महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून महिंद्रा कंपनीकडे जाणारा मार्ग व चौकातील पीएमपीएमला बस थांब्याला महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली होती .

आज दिनांक १५ फ्रेब्रुवारी २०२० रोजी या आंदोलनाला यश आले असून अखेर पालिका प्रशासनाने महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून महिंद्रा कंपनीकडे जाणारा मार्ग व चौकातील पीएमपीएमला बस थांब्याला महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात येईल असे लेखी उत्तर आंदोलनकर्त्यांना दिले आहे.

यावेळी भिमसंग्राम सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राहुल वडमारे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे  आयुक्त श्रावण हर्डीकर  यांनी दखल घेऊन सहायक आयुक्त मंगेश चितळे यांना आमची भेट घ्यायला लावली परंतु ते आजारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भुमि जिंदगीच्या मा अधिकारी कोळप  आमची भेट घ्यायला लावली त्या प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भुमि जिंदगी विभागाचे अधिकारी कोळप व जन संपर्क विभागाचे हेड क्लार्क भोसले यांनी दिनांक 14 /2/2020 या रोजी आमच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आम्हाला आमच्या मागण्या मान्य असल्या बाबत आमच्याशी चर्चा केली व लेखी पत्र दिले आहे. लेखी अश्वासन दिल्यामुळे आमचे दिनांक 11/2/2020 या रोजी पासून चालू असलेले बेमुदत धरणे बैठे आंदोलन दिनांक 14 /2 /2020 या रोजी चार दिवसा नंतर स्थगित करण्यात आले आहे

हे बेमुदत आंदोलन भिमसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. या आंदोलनात प्रदेश महासचिव सुरेन्द्र जाधव, आनंद साळवे, नसरिन शेख, उमेश वाघमारे, सुभाष विद्यानगर, रवि बनकर, मिलिंद तायडे, विशाल सरोदे, दिपक ढावरे, जनता संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष फिरोजभाई मुल्ला, भीम ज्योत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडितराव किर्ते यांनी सहभाग घेतला होता.

Share this: