पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे जागेवरच पुनर्वसन करा ; झोपडपट्टी पुनवर्सन समितीद्वारे परिपञ प्रसिद्ध

पिंपरी ( वास्तव संघर्ष ) – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे जागेवरच पुनर्वसन करावे . कुटुंबाप्रमाणेच प्रत्येकाचा सर्व्ह करावा , तसेच प्रत्येक सदनिका ही ५५० चौरस फुटांची असावी अशा विविध मागण्या फुले , शाहू , आंबेडकर प्रणित गांधीनगर झोपडपट्टी पुनवर्सन गृहनिर्माण संस्था द्वारे एक परिपञ काढून गांधीनगर मधील रहिवाशांची जनजागृती केली जात आहे. गांधीनगर झोपडपट्टी पुनवर्सन समितीच्या वतीने या आधीही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले होते .

गांधीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांची मागणी

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या सदनिकेच्या आधी ‘ डेमो ‘ तयार करून लोकांच्या पुनर्वसन पाहणीसाठी ठेवण्यात यावा . पुनर्वसनाची इमारत समितीची पाच मजल्याशिवाय अधिक असू नये . बालवाडी , समाज मंदिर , सांस्कृतिक भवन ग्रंथालय , मागणी वाचनालय , विरंगुळा केंद्र , प्राथमिक आरोग्य केंद्र , कार्यालय प्रशिक्षण केंद्र आदीची सोय करण्यात यावी .

१८ वर्षांवरील प्रत्येक विवाहित जोडप्याचा स्वतंत्र सर्व्हे करून त्यांना स्वतंत्र सदनिका देण्यात यावी . वीजबचतीसाठी सोलर सिस्टीमची सोय करावी . पाणीबचतीसाठी रेन हार्वेस्टिंग ‘ ची सोय करण्यात यावी . ही इमारत संपूर्णपणे कॉक्रीटमध्ये जमिनीपासून ते टॉप टेरेसपर्यंत विना वीट बांधकाम करण्यात यावी . केंद्र , राज्य सरकार यांनी निधी देऊन स्थानिक नागरिकांना मोफत घरे देण्यात यावीत . सर्व्हे करताना मूळ रहिवाशांचाच करण्यात यावा . झोपडपट्टीच्या एकूण क्षेत्रफळापैकी १०० टक्के जागा ही झोपडपट्टी पुनर्वसनासाठी वापरण्यात यावी .

पुनर्वसन करताना समितीला विचारात घ्यावे . पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शाळेची सोय करण्यात यावी . उद्यानाची सोय करण्यात यावी . प्रत्येक इमारतीखाली स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वतंत्र शौचालयाची सोय करण्यात यावी . या मागण्या मान्य न झाल्यास मूळ झोपडपट्टीधारकांना सात – बारा उतारा देऊन आणि निधी देऊन घर बांधण्यासाठी सहकार्य करावे . पुनर्वसनासंदर्भात थेट संपर्क मूळ । झोपडीधारकाशी ठेवावा . प्रकल्प पूर्ण होईपर्यंत समिती कार्यरत राहणार आहे . आयुक्तांनी समितीच्या मागण्यांचा योग्य विचार करावा . अन्यथा न्यायालयीन दाद मागण्यात येईल , असा इशाराही देण्यात आला आहे .

लक्ष्मण गायकवाड ( माजी सभापती झोपडपट्टी सुधार व गृहनिर्माण , पिं . चिं . मनपा . ) प्रल्हाद कांबळे , अॅड . भैय्यासाहेब वाघमारे ( कायदा सल्लागार ) , अॅड . अतुल कांबळे ( कायदा सल्लागार ) , अॅड . अशोक बड़ेकर ( कायदा सल्लागार ) , दिपक साबळे ( पत्रकार ) सुनिल वडमारे ( पत्रकार ) , भानुदास गायकवाड ( पत्रकार ) , धम्मराज साळवे , लक्ष्मण कांबळे , नशिम शेख , ब्रिजेश वंजाळे , सिद्धार्थ शिरसाठ , अशोक कसबे , दिलीप साळवे , शेषेराव शिंदे चंद्रकांत बोचकुरे , सोहेल शिंदे , अशोक कसवे , गौतम गजभार , विजय ढवळे , सतिश वाघमारे , रवि कांबळे , गोरख खळगे , आत्तम मकसरे , प्रितम बोचकुरे ,

विशाल पवळ , दगड़ पौळ , सुनिल लाडे , निलेश हैद्र , अजय ( बाबा ) कांबळे | लिंबराज कदम , गोबिंद गणागे , लक्ष्मण शिंगाडे , किशोर शिंदे , भिमराव कुलकर्णी , रोहिदास गायकवाड , बाबु गायकवाड , अच्युत गायकवाड , गोकुळ रावळकर , बिलास जाधव , बाळु सावंत , मनोज गायकवाड , निलेश डोंगरे ( सी . ए . ) शामाताई जाधव , अंजना कांबळे , सुमन शिंदे , वंदना यमकुळे , मनिषा साळवे ,

ज्योती कांबळे , आरती सरपते , ज्योती जाधव , विजय गायकवाड ( सहसेक्रेटरी ) , मनोज गजभार ( खजिनदार ) , विनोद जाधव ( सहखजिनदार ) , अजय शेरखाने ( संघटक ) , प्रविण कांबळे ( अध्यक्ष ) विष्णुसरपते ( उपाध्यक्ष ) राजेंद्र साळवे ( सेक्रेटरी ) या समितीत अशा अनेक गांधीनगर रहिवाशांचा समावेश करण्यात आला असून गांधीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this: