क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

नोकरीच्या आमिषाने डॉक्टर तरूणीची 60 हजार रूपयांची फसवणूक

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे एका डॉक्टर तरूणीची सुमारे 60 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली .
टाईम्स जॉब कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे,.

याप्रकरणी दिप्ती सदाशिव नागले ( वय 33 , रा . कोकणे चौक , पिंपळे सौदागर ) असे फसवणूक झालेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे . त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार मिशीका नामक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या दंतचिकित्सक असून त्यांना नोकरीची गरज आहे . आरोपी मिशीकाने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून टाईम्स जॉब कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगितले . त्यांना www . timesjobsregistration . com ही लिंक पाठविली . त्यांच्याकडून 60 हजार रूपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केली . सहायक पोलीस निरीक्षक गुळींग अधिक तपास करत आहेत .

Share this: