अयोध्येत बुद्धविहार उभारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार – रामदास आठवले

वास्तव संघर्ष आॅनलाईन – अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. अनेक वर्षांपासून चा वाद सर्वोच्च न्यायालयाने मिटविला. सर्वांचे समाधान करणारे अत्यंत चाणाक्षपणे चंगल्या पद्धतीने हा वाद मिटविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार आम्ही मानतो. आता अयोध्येत लवकर श्रीराम मंदिर उभारावे; त्याचबरोबर अयोध्येत भव्य मशिद उभारण्यासाठी राज्य सरकार ने लवकर जमीन द्यावी.

अयोध्येत राम मंदिर आणि मशीद बांधावी मात्र त्याचबरोबर अयोध्येत भव्य बुद्धविहार असावे अशी देशभरातील बौद्धांची मागणी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आपण लवकरच भेट घेऊन अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारण्याची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.


ना. रामदास आठवले हे उत्तर प्रदेश च्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी अयोध्या आणि बाराबंकी येथील जाहीर सभांना संबोधित केले. अयोध्या येथे रिपाइं च्या वतीने आयोजित जाहीर सभेत बहुजन समाज पक्षाच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी रिपाइं मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी विचारमंचावर रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता;जवाहर आदी मान्यवर उपस्थित होते.

अयोध्येत भव्य स्वरूपात श्रीराम मंदिर लवकर उभारावे; तसेच अयोध्येत मुस्लिम समाजासाठी भव्यदिव्य मशीद उभारावी त्यासाठी राज्य सरकार ने लवकर मशिदीसाठी जमीन द्यावी तसेच बुद्धविहारा साठी अयोध्येत जमीन राज्य सरकार ने द्यावी अशी मागणी ना . रामदास आठवले यांनी यावेळी केली.

अयोध्येत श्रीराम मंदिर मशीद आणि बुद्धविहार बांधून सर्व समाजाचे समाधान करावे.अयोध्येत श्रीराम मंदिर;मशीद आणि बुद्धविहाराच्या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी अयोध्येतील रिपाइं च्या जाहीर सभेत म्हंटले आहे.

Share this: