देहूरोडमध्ये चार जणांनी मिळून तरुणावर केला खूनी हल्ला

पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडच्या देहूरोड परिसरात पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून एका तरुणावर खूनी हल्ला केला आहे . ही घटना गुरुवारी ( दि. ५) दुपारी साडेचारच्या सुमारास विकासनगर , देहूरोड येथे घडली .

प्रशांत कैलास भालेराव ( वय १९ , रा . ओटास्कीम , निगडी ) असे जखमी तरुणाचे नाव आहे . त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी डॅनी तांदळे , रोहित ओव्हाळ ( दोघे रा . गंगानगर , आकुर्डी ) आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुरुवारी दुपारी जखमी प्रशांत त्यांचे मित्र संतोष साबळे , शुभम जाधव यांच्यासोबत शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते . दुपारी दर्शन झाल्यानंतर तिघेही देहूरोड मधील विकासनगर येथे झिंगाट मिसळ या हॉटेलवर जेवणासाठी थांबले . त्यावेळी चार आरोपी तिथे आले . त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रशांत यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले . यामध्ये प्रशांत यांच्या हाताला , डोक्याला , पायाला व कमरेवर गंभीर दुखापत झाली . देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Share this: