बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड करांचे ९८४ कोटी रुपये एस बँकेत अडकले;पालिकेतील आयुक्तांचे निलंबन करा – संजोग वाघेरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) येस बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने पिंपरी-चिंचवड शहरात देखील याचे पडसाद उमटले आहेत. महापालिकेचे ९८४ कोटी रुपये बँकेत अडकले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसने आज गुरुवारी (दि. ६)पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका जाहीर केली. यावेळी पञकार परिषदेत शहराध्यक्ष संजोग वाघेरे , विरोधी पक्षनेते नाना काटे , महिला अध्यक्षा वैशाली काळभोर , माजी नगरसेवक प्रशांत शितोळे उपस्थित होते

संजोग वाघेरे म्हणाले , राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असताना आम्ही पिंपरी चिंचवड करांचा पैसा सरकारी बँकेतच ठेवण्याचे काम केले माञ भाजप सरकार खाजगी बॅकेत पैसा ठेऊन करदात्यांचे नुकसान करत आहे. आता या खासगी एस बॅकेमुळेच महापालिकेचे ९८४ कोटी रुपये बँकेत अडकले आहेत पिंपरी – चिंचवड महापालिका मिळकत कर , पाणीपट्टी व इतर सुविधा कर आकारते . ते वसूल करण्याचे काम महापालिकेने एस बँकेला दिले आहे . बँकने सब ठेकेदार नेमला असून कंत्राटी कर्मचा – यांमार्फत पैसे बँकेत जमा केले जातात . येस बँक डबघाईला आली आहे . महापालिकेचे तत्कालीन लेखाधिकारी राजेश लांडे यांनी एस बँकेत अनेक खाती उघडले आहेत . त्यामध्ये मोठ्या रकमा आहेत .

बँक ६९९ कोटी नुकसानीमध्ये आहे . बँक अडचणीत येण्याअगोदर महापालिकेने पैसे काढून खाते तातडीने बंद करुन करदात्यांचे पैसे वाचवावेत , असे पत्र ४डिसेंबर २०१९ रोजी आयुक्तांना दिले होते . परंतु , आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले . पत्राला उत्तर देखील दिले नाही . आयुक्त हर्डीकर यांच्यामुळे करदात्यांचे एक हजार कोटी बँकेत अडकले आहेत . याला जबाबदार असणारे आयुक्त व तत्कालिन मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे देखील यावेळी वाघेरे म्हणाले .

Share this: