क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिखलीतील झोपडपट्टीत जुगार व मटका अड्डा सुरु; पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या चिखली येथील स्पाईन रोडवर भीमशक्ती नगर झोपडपट्टी येथे राजरोसपणे जुगार व मटका अड्डा सुरु आहे . मात्र , स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत . मटका अड्डयामुळे गुन्हेगारी मानसिकता वाढत असून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे .

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गुलाब पान पाटील यांनी याबाबत चिखली पोलिसांना निवेदन दिले आहे . स्पाईन रोडवर भीमशक्ती नगर झोपडपट्टी येथे राजरोसपणे जुगार व मटका अड्डा सुरु आहे . मटका आणि जुगार अड्डयांवर गुन्हेगारी मानसिकतेच्या नागरिकांचा राबता असतो . या रस्त्यावरून महिला आणि शाळकरी मुलांची मोठी वर्दळ असते .

यामुळे महिला आणि शाळकरी मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे . जुगार अड्डयामुळे दादागिरी आणि गुंड प्रवृत्ती वाढत असून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे . राजरोसपणे सुरु असलेल्या मटका अड्डयावर आळा घालून परिसरातील महिलांना त्रासमुक्त करावे . तसेच शाळकरी मुलांना येण्या – जाण्यासाठी भीतिमुक्त वातावरण तयार करावे . पुढील आठवडाभरात कारवाई न झाल्यास महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जुगार अड्डे बंद पाडण्यात येतील . असा इशारा देखील निवेदनात दिला आहे .

Share this: