बातम्यामहाराष्ट्र

50 लाखांचे खंडणी प्रकरण ;राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी 

पुणे (वास्तव संघर्ष) पुण्यातील सराफाकडे 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भात परिपत्रक काढत  घोषणा केली आहे.

पुण्यातील सराफाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बांदल यांची पोलिस चौकशी सुरु आहे. या प्रकरणी बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरु असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे’ असं पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपीं आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Share this: