पुण्यात कोयता गँगचा हैदौस; अल्पवयीन मुलाला लाथा-बुक्यांनी मारहाण करत त्याच्या तोंडावर केले मुत्रविसर्जन 

पुणे (वास्तव संघर्ष) किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून सराईत कोयता गँगने एका अल्पवयीन मुलाला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक कारणातून पीडित मुलाचा या गँगमधील तरुणांसोबत वाद झाला. त्यानंतर या गँगने कोयत्याचा धाक दाखवून रेल्वे स्टेशनच्या परिसरात नेले. तिकडे नेल्यानंतर या पाचही जणांनी या मुलाला बेल्टने मारहाण सुरू केली. या टोळक्याने या मुलाला अर्धनग्न केले लाथाबुक्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. बेदम झालेल्या या मारहाणीत हा मुलगा अखेर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतरही ही टोळकी इथे थांबली नाही. त्यांनी त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन केले आणि पसार झाले.

याप्रकरणी चौघा गुंडाना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पीडित मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून तो अद्याप शुद्धीवर आलेला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलाच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याप्रकरणी विनीत सुर्यकांत बिरादार (वय 19),

शुभम राजाभाऊ जाधव (वय 19, रा. समर्थनगर, पिंपरी-चिंचवड), देविदास उर्फ देवा घनशाम पव्हणे (वय 21, रा. काळेपडळ),भारत विशाल राठोड (वय 21, कुंजीरवस्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यातील मुख्य आरोपी सलीम कलिंदर शेख (वय 22, रा. घुलेवस्ती, मांजरी) हा फरार आहे.

Share this: