क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीच्यावर लैंगिक अत्याचार;पोलिसांनी आरोपींला केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) शेजारी राहणाऱ्या तरुणाने एका बारा वर्षाच्या लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले . ही धक्कादायक घटना शनिवारी ( दि . १४ ) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली .

आदित्य युवराज पवार ( वय 19 , रा . चिंचवड ) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार , १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी ( दि . १३ ) सायंकाळी पिंपरीतून बेपत्ता झाली होती तीच्या पालकांनी आसपासच्या परिसरात शोध घेतला माञ ती सापडली नाही त्यानंतर तीच्या पालकांनी पिंपरी पोलिस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याची तक्रार केली त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुलगी घरी परतली . तिच्या आई – वडिलांनी तिची चौकशी केली असता तिने , शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिला आपल्या घरात कोंडून आपल्यावर लैंगिक अत्याचार केले त्यावेळी आणखी एक मुलगाही त्या ठिकाणी गांजा पीत बसला होता . असे सांगितले . मुलीची व्यथा ऐकून पालकांनी मोहननगर पोलिस चौकीत धाव घेतली . पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाला शनिवारी दुपारी अडीचच्या ताब्यात घेतले . अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत

Share this: