बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शहरातील बनावट मास्क व सँनिटायझरची विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करा – नाना काटे 

पिंपरी (वास्तव संघर्ष)  पुणे जिल्हासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज अखेरपर्यंत सुमारे १६ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. परंतु आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये १६ पैकी ९ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून हि चिंतेची बाब आहे. संपूर्ण राज्यामध्ये पुणे जिल्हातील व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाबत जास्तीत जास्त उपाय योजना करणे अत्यावश्यक ठरते. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक त्या उपाय योजना चालू केल्या आहेतच. परंतु अजूनही प्रभावी उपाय योजना राबविण्याची गरज आहे. याबाबत विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, राज्य सरकारने दिनांक ३१/०३/२०२० पर्यंत शाळा,महाविद्यालय, सिनेमा गृह, मॉल बंद ठेवणेबाबत आदेश जारी केले आहेत. तसेच कोरोना बाधितांसाठी विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. त्याच बरोबर परदेशातून आलेले आहेत परंतु ज्यांना कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत त्यांना त्यांच्या घरीच १४ दिवस राहण्याची विनंती केली आहे. तसेच शहरातील नागरीकांना आवश्यक ती वैयक्तीक स्वच्छता ठेवण्याविषयी आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच मास्क व सँनिटायझर वापरण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. मनपाची उद्याने, जलतरण तलाव बंद केलेले आहेत.

 परंतु शहरातील नागरीकांना कोरोना विषाणूविषयी भिती निर्माण झाल्यामुळे सर्वजण मास्क सँनिटायझर विकत घेत आहेत. त्यामुळे विक्रेते बनावट मास्क व सँनिटायझर ची विक्री करु लागले आहेत, त्यामुळे नागरीकांची फसवणूक होत आहे. अशी काही उदाहरणे शहरामध्ये घडलेली आहेत व घडत आहेत. यांच्यावर प्रशासनाकडून आवश्यक ती कडक कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे शहरातील मॉल बंद करण्याचे निर्देश दिलेले असतानाही शनिवार रविवार शहरतील सर्वच मॉल बिनधास्तपणे चालू होते, मॉलचालकांना सक्त ताकीद देऊन ३१ मार्च पर्यत मॉल बंद ठेवणेबाबत सुचना देण्यात याव्यात. त्याच प्रमाणे शहरातील गर्दीची ठिकाणे टाळण्याबाबत नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात यावे. नागरीकांनी घाबरु नये पण आवश्यक ती खबरदारी पाळावी यासाठी

Share this: