राज्यात कोरोनाचा पहिला बळी ;मुंबईतील ६४ वर्षीय रुग्ण दगावला

वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा पहीला रुग्ण दगावल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. ६४ वर्षीय रुग्णाला काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, आज रोजी त्याचा मृत्यू झाला. कोरोनामुळेच या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे . त्यामुळे आता प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिला बळी हा कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये गेला होता. तर दुसरा बळी हा दिल्लीत गेला होता.

तर देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला बळी मुंबईत गेला आहे. हे तीनही मृत ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे आता सर्वांच्याच चिंतेत अधिक भर पडली आहे. दुसरीकडे आज (मंगळवार) पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १२५ पर्यंत जाऊन पोहचली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर कोरोनाचा फैलाव रोखण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे

Share this: