धक्कादायक :रावण टोळीच्या प्रमुखाचा भाऊ सोन्या याचा भरदिवसा आकुर्डीत खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरात रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या भावाचा खून झाला आहे . ही घटना मंगळवारी ( दि . 17 ) दुपारी घडली .

अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव ( २५ , रा . रावेत ) असे खून झालेल्याचे नाव आहे .

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर एक गॅरेज आहे . या ठिकाणी सोन्या हा मित्रांसोबत दारु पित बसला होता . दारू पिताना त्यांच्यामध्ये भांडण झाले . यावेळी चिडलेल्या त्याच्या मित्रांनी गॅरेज मधील साहित्याने सोन्याच्या डोक्यात वार केले .

रक्तबंबाळ झालेल्या सोन्याला तेथेच सोडून मित्र पसार झाले . निगडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले . सोन्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . सोन्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . सोन्या हा रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा भाऊ होता . निगडी पोलिसांनी संशयित ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे .

Share this: