अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी महापालिकेतील 25 वर्षीय महीलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या प्रभागातील कामाचं श्रेय इतर नगरसेवकांनी घेतल्याचं हे प्रकरण आहे. 16 मार्च रोजी ही घटना घडली असून 18 मार्च रोजी गुन्ह्याची नोंद झाला आहे .

जावेद शेख ( रा . दत्तवाडी , आकुर्डी ) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे . याप्रकरणी 25 वर्षीय कर्मचारी महिलेने बुधवारी ( दि . 18 ) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी सकाळी जावेद शेख यांनी फिर्यादी कनिष्ठ अभियंता महिलेला फोन करून आपल्या आकुर्डी येथील कार्यालयात बोलावून घेतले . प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुरू असलेल्या कामावरून फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली . कामाचा फॉलोअप मी करायचा आणि दुसरे नगरसेवक कामाचे क्रेडिट घेऊन जातील . मी 40 ते 50 गुन्हे केले आहेत . तू काय करणार आहेस माझे . मी साईटवर आल्याशिवाय एक वीट पण हलली तर तुमच्याकडे बघूनच घेईन ‘ अशी धमकी दिली . निगडी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: