अखेर वादग्रस्त IPS अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची औरंगाबादला बदली
वास्तव संघर्ष बीड – जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वादग्रस्त महिला पोलीस आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
दलित आणि मुस्लिम समाजाबद्दल आय. पी. एस भाग्यश्री नवटाकेची एक क्लिप सर्वञ वायरल झाली होती . सोशलमिडीयावर नवटाके वर टिका होत होती. आ. पी. एस भाग्यश्री नवटाके या व्हिडीओ क्लिपमध्ये ‘तू मराठा आहेस म्हणून सोडते, तुला माहीत नाही का मी दलितांना कशी मारते ? मी दलितांना हातपाय बांधून मारते आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते असे त्या म्हणताना दिसत आहेत. आत्तापर्यंत २१ जणांना मी चांगलेच फोडून काढले आहे असेही त्या म्हटल्या आहेत.
क्लिप व्हायरल झाल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली. नवटाके यांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये मराठा- दलित असा उल्लेख आहे. बाबूराव पोटभरे यांनी भाग्यश्री नवटाके यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये माजलगावच्या महिला पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके या मराठा समाजातील काही सदस्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हे दाखल झाल्यामुळे मदत मिळवण्यासाठी म्हणून मराठा समाजातील सदस्यांनी त्यांची भेट घेतली होती.त्यानंतर ही व्हिडीओ क्लिप वायरल झाली होती. यासंदर्भात भाग्यश्री नवटाकेना काही पञकारांनी विचारले असता त्यांनी ही क्लिप मी पाहीली नसून या क्लिपचा आणि माझा काही संबंध नाही असे त्यावेळेस त्या बोलल्या होती.
सोमवारपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असाही इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिला होता.तसेच रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी देखील भाग्यश्री नवटाकेवर कार्यवाहीची मागणी केली होती. आता भाग्यश्री नवटाकेची बीड येथून औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे.