पिंपरी चिंचवड : दुकान चालू ठेवणा-या 16 व्यापा-यांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरासह जगभरात करोना विषाणू संसर्गाच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शहरातील पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून चिखली परिसरातील सर्व नागरिकांना बुधवारी (दि.18) आवाहन केले होते.माञ या आदेशाचे उल्लंघन चिखलीतील व्यापा-यानें केले आहे अशा 16 जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत

आज गुरुवारी रोजी अनेक दुकानदारांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरूच ठेवली. यामुळे चिखली पोलिसांनी 16 दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Share this: