पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठे निर्णय जाहीर केले . त्यामध्ये मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड आणि नागपूर हे 31 मार्चपर्यंत बंद असणार असल्याचे त्यांनी सांगितले .त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 1 ली ते 8 वी ची परिक्षा रद्द करून त्यांना सरसकट पास करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईत पञकारांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले.

दरम्यान ,इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी ची परीक्षा दि . 15 एप्रिल नंतर घेण्यात येणार आहे . शिक्षणोत्तर कर्मचारी आणि शिक्षकांना वर्क फ्रॉर्म होम करण्याची मुभा देण्यात आली आहे . इयत्ता 10 वी चे पेपर वेळापत्रकानुसारच होतील असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे .

Share this: